Balasaheb Thorat : अशोक चव्हाण गेले आता बाळासाहेब थोरातांकडे महत्त्वाची जबाबदारी; मल्लिकार्जुन खरगेंचा आला फोन

Balasaheb Thorat : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील एक मोठे नाव होते. त्यांनीच पक्षाचा हात सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, या घटनेनंतर काँग्रेस डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. 

बाळासाहेब थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याच्या संघटना बांधण्याची जबाबदारी मिळणार असल्यातं कळत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याकडून थोरात यांना संपर्क साधण्यात आला आहे. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून सारवा सारवीचा प्रयत्न सुरु झाला आहे.

Pune Crime News : पोलीस चौकीसमोर तरुणानं स्वत:ला पेटवून घेतलं; धक्कादायक कारण आलं समोर

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपचा हात धरलाय, पण त्यांच्यासोबत इतर काही काँग्रेसचे आमदार देखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. अशात काँग्रेसकडून आमदारांशी संपर्क साधला जात आहे. संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply