Bakarwadi : बाकरवडी खाताय? सावधान! बाजारात आली चितळे बंधू यांच्या नावाची बनावट बाकरवडी

Bakarwadi : चितळे बंधू मिठाईवाले यांच्या "चितळे स्वीट होम" नावाची बनावट बाकरवडी बाजारात आली आली आहे. "चितळे स्वीट होम" यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवण्यात आली आहे. ही बाकरवडी चितळे बंधू मिठाईवाले यांची असल्याचे भासवण्यात आली आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करुन फसवणूक ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडीची बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून "चितळे स्वीट होम" नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी करण्यात आली.

'चितळे स्वीट होम' नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि आमच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली. चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवी कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत.

Pune News: पुणेकरांचे पाणी महागले! टँकरच्या पाण्यासाठी मोजावे जागणार जास्त पैसे, नागरिकांना फटका

खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे आढळून आली. या पाकिटांवर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी , कस्टमर केअर नंबर आणि वेबसाईट डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आली

चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधु मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाला आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३५०, ६६(सी), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply