
Badlapur : बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती. यानंतर भाजपवर चहूबाजूंनी टीका झाली. दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या बदलापूर शहरातील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. आपटे त्या प्रकरणातील सहआरोपी आहेत. जामिनावर सुटका झालेल्या आपटेला स्वीकृत नगरसेवक पदी संधी दिल्यानं भाजप वर टीका झाली. यानंतर आपटे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर आपटे यांनी राजीनामा दिला.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर झाली. भाजपनं बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलं.
महायुती-१ सरकार सत्तेत असताना बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला होता. या प्रकरणात शाळेचे पदाधिकारीही आरोपी होते. तुषार आपटेंचा समावेश याच आरोपींमध्ये होता. संस्थेचे सचिव असलेले आपटे अत्याचार प्रकरणानंतर अनेक दिवस फरार होते. ४४ दिवसांनंतर त्यांना कर्जतमधून अटक झाली. यानंतर केवळ ४८ तासांत त्यांना जामीन झाला. यानंतरही ते याच शैक्षणिक संस्थेवर कार्यरत होते. तसंच भाजपकडून पालिका निवडणुकीतही सक्रिय होते.
|
Parbhani : भाजपकडून दिग्गजांना डावलून 22 वर्षांच्या तरुणाला उमेदवारी; नेमका आहे तरी कोण? |
भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. शुक्रवारी भाजपनं तुषार आपटे यांची निवड केली. यावरुन विरोधकांनी भाजपला घेरलं. विकृताला भाजपनं स्वीकृत केलं, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बोचरा वार केला. त्यामुळे आपटे यांची निवड वादग्रस्त ठरली. त्यातच २९ महापालिका निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा अंगलट येणार असल्याचं भाजपच्या लक्षात आलं. त्यामुळे आपटे यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Badlapur : भाजपवर नामुष्की! चौफेर टीकेनंतर अवघ्या 24 तासांत राजीनामा”