Bacchu Kadu : जातीचा संघर्ष थांबवा, छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढावं! बच्चू कडूंचा सल्ला

Bacchu Kadu : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा  अत्यंत कळीचा होऊन गेला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील  यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून वेळीच आमच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन  जरांगे पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेयांनी ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आचा सातवा दिवस आहे. त्यामुळे राज्यांमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असंच काहीसे चित्र निर्माण झालं आहे. अशातच यावर भाष्य करतानाप्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडूंनीही यांनी  जातीचा संघर्ष थांबावून छगन भुजबळ  आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढण्याचा सल्ला दिला आहे. 

Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संगसाठी साडेतीन कोटींची मागणी, पैसे न दिल्याने बेदम मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा

स्वतः भुजबळ आणी जारांगे यांची भेट घेणार- बच्चू कडू

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु आहे. हे थांबलं पाहिजे. एकाकडे कोकणातल्या मराठ्यांनी या मागणीला विरोध दाखवला आहे. तर मराठवाड्यातल्या  मराठा ओबीसी मध्ये यायला तयार आहेत. सध्याच्या आरक्षणात वाढ करून यावर तोडगा काढावा, असं माझं मतं आहे. तसेच ही लढाई भुजबळ आणी जारांगे यांनी एकत्र येऊन लढावी आणि हा जातीचा संघर्ष थांबवावा. यासाठी मी स्वतः भुजबळ आणी जारांगे यांची भेट घेणार असल्याचे मत ही  बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केले आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply