Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण काँग्रेसनं स्वीकारलं नाही, सांगितलं मोठं कारण

 Ayodhya Ram Mandir :  अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलंय. राममंदिराचा हा कार्यक्रम त्यांनी आरएसएस आणि भाजपचा असल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या अजेंडाचा भाग म्हणून अपूर्ण मंदिराचं उद्घाटन केल्याचा आरोपही भाजपवर त्यांनी केलाय.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा  कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण काँग्रेसने नाकारलं आहे. पक्षातर्फे एक निवेदन जारी करण्यात आलंय. यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.

Jalgaon Crime : भिंतीला भगदाड पाडून कंपनीत चोरी; वस्तूंसह सीसीटीव्हीही नेला चोरून

राजकीय प्रकल्प बनवत असल्याचा आरोप

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आपल्या देशात लाखो लोक रामाची पूजा करतात. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय प्रकल्प बनवल असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ते पुढे म्हणाले की अपूर्ण मंदिराचं  उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपचे म्हणणे आहे की, काँग्रेसला यायचे नसेल, तर ती त्यांची मर्जी आहे. आम्ही आमंत्रणं पाठवली आहेत, त्यांना यायचे नसंल तर काही हरकत नाही.

राजकीय प्रकल्प बनवत असल्याचा आरोप

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन जारी करताना सांगितले की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येत आयोजित कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना राम मंदिराच्या  उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं होतं. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. आपल्या देशात लाखो लोकरामाची पूजा करतात. पण आरएसएस आणि भाजपने अयोध्येतील मंदिराला दीर्घकाळ राजकीय प्रकल्प बनवल असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ते पुढे म्हणाले की अपूर्ण मंदिराचं  उद्घाटन भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी केलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपचे म्हणणे आहे की, काँग्रेसला यायचे नसेल, तर ती त्यांची मर्जी आहे. आम्ही आमंत्रणं पाठवली आहेत, त्यांना यायचे नसंल तर काही हरकत नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply