Aut o Fare Hike : रिक्षाचं भाडं वाढवा, अन्यथा... संघटनेकडून राज्य सरकारला अल्टिमेटम

Aut o Fare Hike  : मुंबईत दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑटोरिक्षा संघटनेने सरकारकडे रिक्षाच्या भाडेवाढी बाबत मागणी केलीये. आपली मगणी मान्य करण्यासाठी किंवा यावर विचार करण्यासाठी संघटनेने सरकारला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत २ रुपयांची भाडेवाढ लागू करण्याचा अल्टिमेटम

उपनगरातील  ऑटोरिक्षांचे किमान भाडे २३ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे. २३ रुपयांवरून थेट २५ रुपयांपर्यंत भाडे वाढ झाल्यास सामान्य नागरिकांच्या खिशावर याने भर पडणार आहे. या मागणीसाठी सरकारला ३१ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय.

Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'ने राज्य सरकारला दिली आठवड्याची मुदत, सळो की पळो करून सोडण्याचा प्रशांत डिक्करांचा इशारा

सध्याची वाढती महागाई पाहता गेल्या वर्षी किमान २१ रुपयांचे भाडे वाढवून २३ रुपये करण्यात आले. मात्र फक्त २३ रुपये भाडे परवडणारे नाही. गेल्यावर्षी केलेला करार आम्हाला मान्य नाही. या किंमतीत आम्हाला खर्च चालवणे कठीण आहे, असंही रिक्षा संघटनेमधील एका व्यक्तीने म्हटलंय.

रिक्षा चालकांनी पुढे म्हटलं की, आम्हाल भाडेवाढ मिळावी यासाठी स्थापन समितिने अहवाल सादर केलेत. समितिने दिलेल्या अहवालात रिक्षा भाडे २ रुपयांनी वाढवून २५ रुपये करण्यात यावे असं लिहिलं आहे.

या प्रकरणी वरिष्ठ परिवहन अधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी म्हटलं की, कोणताही भाडेवाढीचा प्रस्ताव प्रथम परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणासमोर (एमएमआरटीए) आणला जातो. त्यानुसार भाडेवाढ करायची की नाही हे ठरवले जाते.

वाहनांचा भांडवली खर्च, देखभाल आणि दुरुस्ती खर्च, विमा, कर यासह इतर काही घटकांमुळे भाडेवाढ व्हावी अशी मागणी केली जातेय. MMRTA ने ऑक्टोबर २०२२ मध्ये रिक्षासाठी २ रुपये आणि टॅक्सींसाठी ३ रुपये वाढ दिली होती. यात रिक्षाचे किमान भाडे २१ ते २३ रुपये आणि टॅक्सींसाठी २५ ते २८ रुपये करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply