T20 World Cup 2024 : फिल्डिंगसाठी उतरले कोचआणि सिलेक्टर, वर्ल्डकप सामन्यात टीम ऑस्ट्रेलियावर का आली अशी वेळ?

Australia T20 World Cup warm-up match : टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियासमोर एकनवी समस्या उभी राहिली आहे. आयपीएल 2024 मुळे त्यांना सराव सामन्यासाठी पूर्ण 11 खेळाडू मिळाले नाहीत. याच कारणामुळे कांगारू संघाच्या वतीने सहाय्यक प्रशिक्षक आंद्रे बोरोवेक आणि राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली यांना मैदानात उतरावे लागले. मात्र, असे असतानाही संघाने हा सामना अगदी सहज जिंकला.

खरंतर, ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू आयपीएल 2024 मध्ये सहभागी झाले होते. यातील काही खेळाडूंच्या संघांनी प्लेऑफ आणि फायनलपर्यंतचा प्रवास केला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन मोठे आणि प्रमुख खेळाडू आयपीएल 2024 चा अंतिम सामना खेळत होते. पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड सनरायझर्स हैदराबाद संघात होते, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क केकेआर संघाचा भाग होता.मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात आहेत. कॅमेरून ग्रीन अद्याप वेस्ट इंडिजला पोहोचलेला नाही. याच कारणामुळे सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे खेळाडूची कमतरता होती.

Ind Vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट; ICCच्या 'या' नियमाने वाढवली सर्वांची चिंता

या कारणास्तव, ऑस्ट्रेलियाला 11 खेळाडू पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षक आणि निवडकर्त्याची निवड करावी लागली. सहाय्यक प्रशिक्षक आंद्रे बोरोवेक आणि राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली संघाच्या वतीने मैदानात उतरले. दोघेही स्क्वेअर लेग आणि फायनल लेगच्या दिशेने उभे असलेले दिसले. याशिवाय मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डही काही काळ मैदानात उतरले.

पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात सराव सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नामिबियाचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 119 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 10 षटकात 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 25 धावा देऊन 3 बळी घेतले. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 4 षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply