ATM Crime : सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून एटीएम फोडले; १४ लाख रुपये घेऊन चोरटे फरार

Chhatrapati Sambhajinagar : चोरट्यांकडून एटीएम मशीन टार्गेट करण्यात येत आहेत. रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत एटीएम मशीन फोडून रक्कम लांबविली जात आहे. अशाच प्रकारे संभाजीनगरमधील अहिल्यानगर रोडवरील गरवारे कारखान्यासमोर असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी तोडून रोख रकमेचा ट्रे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

संभाजीनगर शहरातील अहिल्यानगर रोडवर ऍक्सिस बँकेचे एटीएम मशीन आहे. या एटीएमवर रात्रीच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून एटीएममध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीनचा पत्रा कापून तोडत रक्कम ठेवलेला ट्रे घेऊन चोरटे पसार झाले. या एटीएममध्ये १४ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रवेश करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

दरम्यान एटीएममध्ये प्रवेश करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. तीन- चार जण चोरी करण्यासाठी एटीएममध्ये आल्याचे यात दिसून येत आहे. मात्र त्यानंतर चोरट्यांनी कॅमेऱ्यावर स्प्रे मारत ही चोरी केली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

यवतमाळात एटीएम कार्डची हेराफेरी करणाऱ्या दोघांना अटक एटीएम मशीनवर एक वयोवृद्ध महिलांना पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करीत हात चलाखीने एटीएम कार्डाची हेराफेरी करून खात्यातील पैसे काढून प्रसार झाल्याच्या प्रकारचे गुन्हे यवतमाळ व दारव्हा शहरात घडले. या आरोपींचा माग घेत एलसीबी पथक थेट आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात पोहोचले. तेथून दोघांना ताब्यात घेतले असून एक प्रसार झाला. कृष्णा मल्लप्पा भीमनळीकर (रा. बेंगलोर कर्नाटक) व मोहन्ना व्यंकटरमण चिंताला (रा. आंध्र प्रदेश) असे दोघांची नावे आहेत. तर यातील सूत्रधार एस. कृष्णमूर्ती पसार झालाय.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply