Atiq Ahmed Case : गँगस्टर अतिक- अशरफच्या हत्येप्रकरणी 17 पोलिसांचे निलंबन, उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी!

Uttar Pradesh News: गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 17 पोलिसांचे निलंबन केले आहे. हे सर्व पोलिस अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या सुरक्षेसाठी तैनात होते. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच कलम 144 लागू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीमध्ये त्यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसंच योगी आदित्यनाथ यांनी अतिक आणि अशरफ यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या 17 पोलिसांचे निलंबन केले.

अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी योगी सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. तसंच प्रयागराज, उन्नावसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू केले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज त्यांचे सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले. त्यांनी अधिकाऱ्यांना दर दोन तासांनी रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या 75 जिल्ह्यांच्या डीएम आणि एसपींना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासह शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची मीडियाशी बोलताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्या. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह देशभरात एकच खळबळ उडाली. अतीक आणि अशरफच्या हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन हल्लेखोरांना अटक केली. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी आरोपींची नावं आहेत. या तिन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply