Assembly Election Result : सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होताना दिसत आहे. यात काँग्रेसचे तीन महत्वाचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, धिरज देशमुख पिछाडीवर गेले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांना होता. मागच्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी जनता आपल्या बाजूने असल्याचं ते म्हणत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवासाठी मोठी फिल्डिंग लावली होती.

Maharashtra : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

विदर्भात भाजपने २५ जागा घेत महाविकास आघाडीला जोराचा धक्का दिलाय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भाजप ११५, शिंदे गट ५६, अजित पवार ३५ जागांवर आघाडी घेतली. तर मविआकडून शरद पवार गट ११, ठाकरे गट-२०, काँग्रेस -२२ जागांवर आघाडी घेतलीय. यात काँग्रेसचे तीन दिग्गज नेत्यांना जोरात मात मिळालीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, आणि बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply