Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी; जिंकलं 41 वर्षातलं पहिलं पदक

Asian Games 2023 : भारताने घोडेस्वारी प्रकारात तब्बल 41 वर्षानंतर पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. भारतीय संघात दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, छेडा, अनुष अगरवाल्ला यांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 14 पदके जिंकली आहेत. भारताचे हे आजच्या दिवसातील तिसरे पदक आहे.

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, बनली टीम इंडियाची पहिली 'कर्णधार'

भारताने इक्वेस्टेरियन (घोडेस्वारी) ड्रेसेज टीमने चीन आणि हाँगकाँग सारख्या तगड्या संघांना मात देत आपले या क्रीडा प्रकारातील पहिले विहिले सुवर्ण पदक जिंकले. संघातील दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, छेडा, अनुष अगरवाल्ला यांनी एकूण 209.205 गुण मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply