Ashok Chavan News : 'भाजपमध्ये कोण- कोण जाणार? नावे जाहीर करावी...' अशोक चव्हाणांचे विखे पाटलांना आव्हान

Ashok Chavan News : देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वार- पलटवार अन् आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमधील अनेक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला होता. विखे पाटलांच्या या दाव्यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

"काँग्रेसमधील  अनेक जण भाजपात येण्यासाठी इच्छुक असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते. विखे पाटील यांच्या या विधानावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले असून भाजपाच्या संपर्कात कोण कोण आहेत त्यांची नावे जाहीर करावी, असं गुपीत ठेऊ नये..." असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

Crime News : उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाची संभाजीनगरात मोठी कारवाई; विघातक हालचालींचा संशय, 14 जणांना नोटीस

जागा वाटपासंदर्भात मतभेद नाहीत..

"महाविकास आघाडीच्या  जागा वाटपासंदर्भात काँगेसच्या केंद्रिय समितीने आमची मत जाऊन घेतली. केंद्रिय समीती जे निर्देश देईल त्या अनुषंगाने तिन्ही पक्षाशी चर्चा करुन, मित्र पक्षांना सोबत घेऊन निर्णय अपेक्षित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत सोबत घेण्याविषयी मतभेद नाहीत, जागा वाटपात मार्ग निघेल याची खात्री असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले तर स्वागत..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेशाबद्दलही अशोक चव्हाण यांनी मोठे विधान केले. गेल्या वेळी राजू शेट्टी काँगेस सोबत आले होते तेंव्हा त्यांना त्यांची आणि सांगलीची अश्या दोन जागा दिल्या होत्या. आता ते आले तर त्यांचं स्वागत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.

चिखलीकरांना टोला..

"अशोक चव्हाण भाजपात आले तरीही लोकसभेची निवडणूक मीच लढवनार असा दावा नांदेडचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. माझा पक्ष आणि मोदीसाहेब सोबत आहेत त्यामुळे मला कोणीही हरवू शकत नाही, असा विश्वासही चिखलीकरांनी व्यक्त केला होता. यावर बोलताना अशोक चव्हाण यांना मी कश्याला घाबरायचं, त्यांना उत्तर द्यायच नाही. ती मोठी मानस आहेत.." असा टोला लगावला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *