Ashish Deshmukh Suspended : आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी! ६ वर्षांसाठी केलं निलंबीत

Ashish Deshmukh Suspended : आशिष देशमुख यांचं काँग्रेस पक्षामधून ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती.

एकून सहा वर्षांसाठी आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर देशमुख यांना भाजपकडून विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. यानंतर आता आशिष देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आली. ते काटोलचे माजी आमदार आहेत.

५ एप्रिल रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना एक नोटीस पाठवली होती. यानंतर देशमुख यांनी ९ एप्रिल रोजी उत्तर दिलं. पण हे उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षाविरोधत वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply