Ashadhi Wari : भक्तिसागरासाठी पुणेकर सज्ज

Ashadhi Wari : - टाळ-मृदंगाच्या गजरात 'ज्ञानोबा, तुकोबां'चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्याचा भक्तिसागर उद्या (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी जय्यत तयारी केली आहे, पुणे महापालिका प्रशासनातर्फे निर्मल वारीसाठी २४ तास स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, पाणी, निवासाची व्यवस्था आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीतून, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाले आहे. या दोन्ही संतांचे पालखी सोहळे पुण्यात एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांसह परिसरातील उपनगरांमधून भाविकांची अलोट गर्दी होते. शहरात दोन दिवस लाखो वारकऱ्याऱ्यांचा मुक्काम असणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनातर्फे वारीची तयारी सुरू होती.

Ashadhi Wari : मुख्यमंत्री हरिनामात दंग; फुगडी खेळण्याचा घेतला आनंद

एक हजार ६९५ स्वच्छतागृहे

महापालिकेची शहरात अनेक भागांत सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत, पण वारीच्या काळात ती कमी पडतात, त्यामु‌ळे महापालिकेने १ हजार ६१५ मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गासह मुक्कामाच्या ठिकाणी ही फिरती स्वच्छतागृहे ठेवली गेली आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply