Ashadhi Wari 2023 : वारकरी पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने..., आळंदीत लाठीचार्जसंदर्भात मोठी अपडेट

Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आळंदीमधून प्रस्थान झालं. मंदिर व्यवस्थापनाने केवळ मानाच्या पालख्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. वारकरी पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मिळालेल्या व्हिडीओमध्ये, संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून पोलिसांना धक्काबुक्की करत, मागे ढकलत आणि त्यानंतर पोलीसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्याने या घटनेला नवं वळण लागलं आहे.

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटले आहे. आळंदीमध्ये लाठीचार्ज झालेला नाही. वारकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. मागील वर्षी तेथे चेंगराचेंगरी झाली होती. महिलाही जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काटेकोरपणे नियम पाळले जात आहेत. मानाच्या ५६ दिंड्यांमधील ७५ पासेस देण्यात आले होते. मंदिराबाहेर काही वारकरी आणि तरुण होते त्यांची मागणी आत जाण्याची मागणी होती.

४००-५०० जण आत जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता, असं गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply