पुणे : रस्त्यातील खड्ड्यात कागदी होड्या मनसेचे अनोखे आंदोलन

पुणे : कोथरूड भागातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्ड्यांच्या निषेधार्थ रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड शाखेकडून आज (सोमवार) अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्डे तातडीने न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

शहरात गेल्या आठ दिवसात झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाऊस, रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच कोथरूड परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. कोथरूड विभाग प्रमुख सुधीर धावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्य आंदोलनात विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, शहर संघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, सचिन विप्र, गणेश शिंदे, पांडुरंग सुतार, शाखा अध्यक्ष विराज डाकवे,किरण उभे, शुभम गुजर, किरण जोशी, ज्ञानेश्वर काकडे यावेळी उपस्थित होते.

खड्ड्यांभोवती रांगोळी काढून आणि खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन कर ण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *