Ashadhi Ekadashi Mahapuja : पंढरपुरात विठू नामाचा गजर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न

Ashadhi Ekadashi Mahapuja : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

अकरा पत्रा शेड भाविकांनी फुल्ल झाले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्करावर दहशतवाद्यांचा हल्ला, 4 जवान शहीद

यावेळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.‌

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शिंदे गट आणि भाजपच्या अनेक आमदार खासदारांची उपस्थित होती.

दरम्यान, आषाढी यात्रेच्या मुख्य सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या स्नानासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची एकच झुंबड उडाली होती. यामुळे संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झालं आहे. लाखो वारकऱ्यांच्या विठ्ठल नामाच्या गजरामुळे अवघं पंढरपूर दुमदुमून गेलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply