Arvind Kejriwal : दिल्ली सरकार तुरुंगातून चालणार! CM अरविंद केजरीवाल यांचा 'ईडी कोठडी'तून पहिला आदेश जारी

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा कारभार कसा चालणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून सरकार चालवणार असल्याचे स्पष्ट केले असून आज त्यांनी कोठडीतून पहिला आदेशही जारी केला आहे.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीईडी कोठडीतून पहिला आदेश जारी केला आहे. दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित हा पहिला आदेश अरविंद केजरीवाल यांनी जारी केला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार हे दिल्लीमधून चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

K. Kavita : लाच प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता सहभागी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका चिठ्ठीद्वारे जलमंत्र्यांना आपला आदेश जारी केला आहे. याप्रकरणी दिल्ली सरकारमधील जलमंत्री आतिशी रविवारी त्यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊ शकतात. तसेच दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू आहेत.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी तथाकथित दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. ईडीने मुख्यमंत्र्यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले.

त्यानंतर न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तसेच ईडीच्या अटकेविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply