Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा धक्का; तात्काळ सुनावणी करण्यास दिला नकार

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केजरीवाल यांना कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करत २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे. ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुटकेसाठी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठवला. त्यांनी २४ मार्चपर्यंत तत्काळ सुनावणीची मागणी केली. मात्र, हायकोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला.

आम आदमी पक्षाचे नेतेअरविंद केजरीवाल यांनी अटक आणि ईडी कस्टडीला कोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिलं. मात्र, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला.

Arvind Kejriwal : 'अटक आणि रिमांड दोन्ही बेकायदेशीर, तात्काळ सुटका करा', केजरीवाल यांची हायकोर्टात धाव

अरविंद केजरीवाल यांनी याचिकेत अटक आणि ईडी कस्टडी बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांनी शनिवारी याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली होती. परंतु या प्रकरणात २७ मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

२७ मार्चला सुनावणीची शक्यता

याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास हायकोर्टाने नकार दिला. ईडीने कोर्टाकडून केजरीवाल यांची दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने केजरीवाल यांना दहा दिवसांची ईडी कोठडी दिली. या प्रकरणात आता केजरीवाल यांना २८ मार्चला पीएमएलए कोर्ट हजर करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply