Andre Russell : गेल, कोहलीलाही पडला भारी; नावावर केला 'हा' विक्रम, बॉलिवूडचा 'पठाण'ही झाला खूश

 

Andre Russell : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या १७ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून २०८ धावा केल्या. रसेलच्या तुफानी खेळीमुळे कोलकाताने धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात कोलकाता नाइटरायडर्सकडून सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला

कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आंद्रे रसेलचा कहर पाहायला मिळाला. रसेलने २५ चेंडूत २५६ च्या स्ट्राईक रेटने ६४ धावांची शानदार खेळी खेळली. यात ३ चौकारांसह ७ उत्कृष्ट षटकारांचा समावेश आहे. या फटेकबाजीमुळे रसेलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. दरम्यान रसेलचे उत्तुंग षटकार पाहून बॉलिवूडचा 'पठाण' शाहरूख खानदेखील खूश झालाय.

IPL 2024 : ऋषभ पंत आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने घेतला महत्त्वाचा निर्णय! फ्रँचायझीने रात्री केली मोठी घोषणा

आंद्रे रसेलने अनुभवी जलद गती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या चेंडूंवर भरपूर धावा ठोकल्या. भुवनेश्वरने ४ षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये एकही गडी न बाद करता त्याने तब्बल ५१ धावा दिल्या. या सामन्यात रसेलने भुवनेश्वरची जोरदार धुलाई केली. त्याने ९ चौकार आणि ८ षटकार मारलेत.

सर्वाधिक षटकार कोणी ठोकले

आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा रसेल हा ९वा फलंदाज ठरलाय. यासाठी त्याने ९७ डाव खेळले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने १४१ डावात ३५७ षटकार मारलेत. त्यांच्याशिवाय रोहित शर्माने २५७, एबी डिव्हिलियर्सने २५१, महेंद्रसिंग धोनीने २३९ ,, विराट कोहलीने २३५, डेव्हिड वॉर्नरने २२८, केरॉन पोलार्डने 223 आणि सुरेश रैनाने आयपीएलमध्ये 203 षटकार ठोकले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply