Andheri By-election: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंविरोधात उमेदवार ठरला, भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी जाहीर

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्याविरुद्ध भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र मुरजी पटेल भाजपचे उमेदवार या निवडणुकीत रिंगणात असतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशिष शेलार यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. मुरजी पटेल उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत.

मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच दुपारी एक पोस्टर व्हायरल झालं होते. या पोस्टरमध्ये लिहिलं होतं की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने आपले लाडके नेते आणि अधिकृत उमेदवार मुरजी पटेल (काका) मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहेत. 

त्याआधी अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply