Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण

Amritsar Blast : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानकडून होणारे हल्ले भारताने थोपवले. दोन्ही देशाकडून युद्धबंदी जाहीर झाली असून, भारत - पाकिस्तानमध्ये सध्या शातंता आहे. अशातच अमृतसरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमृतसरमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न एकाचा फसला आहे. बॉम्ब ठेवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या हातातच बॉम्ब फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या अमृतसरमधील नौशेरा गावाजवळ सकाळी हा स्फोट घडला. २७ मे रोजी सकाळी ९:३० वाजता हा स्फोट झाला. स्फोट घडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या हातात बॉम्ब होता. मात्र, त्याच्या हातातच बॉम्ब फुटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्फोट घडवणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही हात निकामी झाले असल्याचे सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचा रूग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला.

Daund Heavy Rain : दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; पोल्ट्रीफॉर्ममधील १८ हजार कोंबड्या दगावल्या, ८५ लाखाचे नुकसान

हा स्फोट घडल्यानंतर आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, 'आम्हाला सकाळी नऊच्या सुमारास स्फोटाचा आवाज आला. आम्ही तातडीने घटनास्थळी धावत गेलो. त्या ठिकाणी एक व्यक्ती गंभीररित्या जखमी होऊन पडला होता. त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. रूग्णवाहिकेलाही बोलावून घेतलं, सध्या तपास सुरू आहे'.

पोलिसांनी काय सांगितलं?

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक सतींदर सिंग यांनी सांगितलं की, 'जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तो एका दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती आहे. तो स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. '

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply