Amravati Lok Sabha : निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या सहा उमेदवारांना नोटीस; ४८ तासात खर्च सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Amravati Lok Sabha : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाले आहे. यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च सादर करावा लागत असताना अमरावती मतदार संघाच्या रिंगणात असलेल्या ६ उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिल्यानुसार दैनंदिन खर्च सादर करावा लागत असते. त्यानुसार अमरावती लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या  रिंगणात असून त्यांना देखील आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. मात्र खर्चाच्या पहिल्या तपासणीच्या वेळी ३७ पैकी सहा उमेदवार अनुपस्थित होते. यामुळे त्या सहा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

Shrikant Shinde : हसायचं की रडायचं? पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले; श्रीकांत शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर

या अनुपस्थित असणाऱ्या उमेदवारांना ४८ तासाच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सन नियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे. विहित मुदतीत खर्च साधारण न केल्यास तक्रार दाखल करून सर्व परवानग्या रद्द करण्यात येणार असल्यास सुद्धा त्यांना नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply