Amravati Crime : 'तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन' ६२ वर्षीय पोस्टमॅनकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Amravati Crime : अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ६२ वर्षीय नराधम पोस्टमॅनने एका अल्पवयीन मुलीलवर लैंगिक अत्याचार केला आहे. तब्बल एक वर्ष नराधम तरूणीचा शारीरिक शोषण करत होता. कुणी घरी नसल्याचा फायदा घेत आरोपी तरूणीच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता.

वर्षभर चाललेल्या या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडित तरूणीने धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश तुळशीराम पंडिया (वय वर्ष ६२) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरूणी ही १७ वर्षांची आहे. पीडित मुलगी अमरावती येथील वरूड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. १ मे २०२४ रोजी घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या घरात शिरकाव केला. तसेच 'तु्झ्या आई वडिलांना ठार मारेन' अशी धमकी देत त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

नराधम वर्षभर तरूणीवर लैंगिक अत्याचार करत होता. वर्षभर चाललेल्या या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस करून अखेर कुटुंबाला याची माहिती दिली. तसेच पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावून त्यांना याची माहिती दिली.

वरूड पोलिसांनी अल्पवयीन तरूणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे करीत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply