Amol Mitkari : नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेले आरोप खोटे; आमदार अमोल मिटकरींकडून संजय राऊतांच्या आरोपाचे खंडन

Akola  : नीलम गोऱ्हे या लक्षवेधी मांडण्यासाठी पैसे घेत असल्या संदर्भात संजय राऊत यांनी लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगत आरोपांचे खंडन केले. उलट नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक वेळी आमच्यासारख्या आमदारांना जनतेचे प्रश्न प्राधान्य क्रमाने उचलण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

लक्षवेधी मांडण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या पैसे घेत असल्याचा आरोप आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, संजय राऊतांच्या या आरोपांचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेत आरोपांचे खंडन केले आहे.

एक रुपया न घेता आमदार केले दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सिडीजच्या आरोपांवर बोलताना त्यांनी आपल्या पक्षाचे उदाहरण दिले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काय चालतंय हे आपल्याला माहित नाही.‌ मात्र राष्ट्रवादीमध्ये पैसे घेऊन आमदार केले जात नाही. कारण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला अजित पवार यांनी एक रुपयाही न घेता आमदार केल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.‌

दुकानात पुड्या बांधणारा आमदार झाला

तसेच याबाबत अधिक बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, कि माझे वडील लोकांकडे सालगडी म्हणून काम करत होते. तर मी स्वतः वडिलोपार्जित असलेल्या किराणा दुकानात पुड्या बांधण्याचे काम करीत होतो. अशा व्यक्तीला पक्षाचे आमचे नेते अजित पवार यांनी आमदार केले. यापेक्षा मोठी गोष्ट होऊ शकत नाही; असे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply