Amit Shah On Ajit Pawar : 'अजितदादा योग्य जागेवर बसलात, पण यायला थोडा उशीर केलात'; अमित शहा यांचं मोठं विधान

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठं वक्तव्य केलं. 'अजितदादा पहिल्यांदाच माझ्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी सांगू इच्छितो की, अजितदादा, आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. पण, तुम्ही याठिकाणी बसण्यासाठी थोडा उशीरच केला, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अमित शहा यांनी सहकार विभागाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

अमित शहा म्हणाले, 'अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा , आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केलात'.

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात! हजारा एक्सप्रेसचे १० डबे घसरले; १५ जणांचा मृत्यू

अमित शहा पुढे म्हणाले, 'सहकार विभागाच्या माध्यमातून पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेच संकल्प घेतला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात ६० कोटींहून अधिक गरीब लोकांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मदत केली आहे'.'गरीबांच्या इच्छा गेल्या ७० वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या. पण पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कालावधित सगळं काम करून टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असे अमित शहा म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply