Amit Shah : रामाशिवाय देशाची कल्पना अशक्य.. लोकसभेत अमित शहांचे जोरदार भाषण

Amit Shah : मोदी सरकारच्या काळातील शेवटचे लोकसभा अधिवेशन आज पार पडत आहे. आज अखेरच्या सत्रात केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राममंदिर निर्माणावरुन विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. राममंदिरासाठी मोठा संघर्ष केला आहे, हे पंतप्रधान मोदींंमुळेच शक्य झाले, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

काय म्हणाले अमित शहा?

"मला आज कुणाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं नाही. मला माझी मन की बात सांगायची आहे. 22 जानेवारी हा दिवस दहा हजार वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतहासिक दिवस आहे. 22 जानेवारी हा दिवस राम भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा दिवस, अध्यात्मिक क्षेत्रातील चेतना देणारा दिवस, देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेणारा दिवस, जे लोक रामाशिवाय देशाची कल्पना करतात ते देशाला ओळखत नाहीत. रामराज्य हे एका विशेष धर्मासाठी नाही तर ते देशासाठी आवश्यक आहे.." असे अमित शहा यावेळी म्हणाले.

Andhra Pradesh Accident : दोन ट्रक, बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू; २० जखमी

"रामायण फक्त हिंदू धर्मात नाही तर सर्व धर्मात आहे. या राम मंदिरासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. रामसेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होते. भाजप आणि आमच्या नेत्यांसाठी राम मंदिर हमाडपंथी प्रचाराचा, राजकारणाचा विषय कधीच नाही, असे म्हणत तुम्ही सुप्रीम कोर्टाचा मान राखत नाहीत का?" असा सवाल अमित शहा यांनी विरोधकांना विचारला.

मोदींशिवाय अशक्य...

"राममंदिरासाठी मोठा संघर्ष केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाची लढाई लढलो त्यानंतर आम्ही राम मंदिर पूर्ण केले. करोडो लोकांनी आपली श्रद्धा अयोध्येत पोहोचवली. कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही राम मंदिर बांधलं. अडवाणी, अशोक सिंघल, नरेंद्र मोदी यांनी आंदोलन केलं. राम मंदिर पूर्ण करणे नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाशिवाय शक्य नव्हते, अनेकजण म्हणत होते देशात रक्तपात होईल. पण रक्ताचा एकही थेंब न सांडता करून दाखवलं, असेही अमित शहा म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply