Amit Bhosale Case : अमित भाेसले खूनप्रकरणी सातारा पाेलिसांना गाेव्यात मिळाले धागेदाेरे, पाचजण ताब्यात

Satara : वाढे गावच्या हद्दीत काही दिवसांपुर्वी शुक्रवार पेठेतील अमित भाेसले या युवकाचा खून झाला हाेता. या खूनाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संशयित म्हणून पाच ते सहा जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. साता-याचे एसपी समीर शेख यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती समजू शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे बंगळूर महामार्गावर साता-यानजीक एका हाॅटेल परिसरात शुक्रवार पेठेतील वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले याचा खून झाला हाेता. या घटनेनंतर सातारा पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

एसपी समीर शेख यांनी विविध ठिकाणी पोलिसांची पथके तयार केली हाेती. या खून प्रकरणातील काही संशयित हे गाेव्यात (goa) असल्याची महत्तवपुर्ण माहिती सातारा तालुका पोलिसांनी मिळाली. त्यानंतर गोवा पोलिसांशी संपर्क साधत संशयितांवर नजर ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या.
 
सध्या या प्रकरणातील पाच ते सहा संशयित हे गोवा राज्याच्या पाेलिसांच्या ताब्यात आहेत. सर्व संशयितांना सातारा येथे आणले जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत एसपी समीर शेख हे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे समजते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply