Sant Dnyaneshwar Samadhi : माउलींच्या संजीवन समाधीवर गुलाबांची पुष्पवृष्टी

Alandi - समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्यावर सोन्यांचे आभूषण आणि गुलाबांच्या पुष्पात गुंफलेला मोरपिसांचा घातलेला हार.... असे कृष्ण रूपातील मनमोहक सजविलेले माउलींची समाधी डोळ्ळ्यात साठवीत भाविकांनी दर्शन घेतले.
भाविकांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या गजरात आणि माउलीनामाचा अखंड जयघोषात माउलींच्या संजीवन समाधीवर सोमवारी (२६) मध्यरात्री बारा वाजता गुलाबांची पुष्पवृष्टी, पेढे, सुंठवडा वाटून आळंदीतील देऊळवाड्यात माउली जन्मोत्सव साजरा केला. माउली माउलीचा गजर आणि घंटानादाने परिसर मध्यरात्रीनंतर दुमदुमून गेला.

आळंदी देवस्थानच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन परंपरेने केले होते. सायंकाळी नामदेवशास्त्री यांचे कीर्तन झाले. दरम्यान, काल रात्री देऊळ वाड्यात धुपारती झाल्यानंतर नऊ ते साडे नऊ हरिपाठ झाला. त्यानंतर तयारी सुरू झाली ती माउलीजन्माची.

माउली जन्माचा सोहळा समीप आल्याने आळंदीकर भाविकांना दरवाजातून मंदिरात सोडण्यास सुरुवात केली. दहा ते बारा या वेळेत पंखा मंडपात मोझे कुटुबियांच्या वतीने माउली जन्माचे कीर्तन लक्ष्मण चोरट यांनी केले. त्याचवेळी वीणा मंडपात आळंदीकर ग्रामस्थांचे भजन सुरू होते.

Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंकडे विधानसभेसाठी आले १०० अर्ज! भुजबळांविरोधात 7 जण इच्छुक, विधानसभा कोण गाजवणार?


दरम्यान समाधी गाभारा मंडपात, साडे अकरा ते बारा च्या दरम्यान प्रमुख विश्वस्त अड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते कृष्ण जन्मानिमित्त गोकूळ पूजन झाले. त्यानंतर वेध लागले ते माउली जन्माचे. ब्रह्मवृंदांनी मुख्य समाधी गाभारा स्वच्छ केला आणि समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून अत्तराचा दर्प देत समाधी सजविली.
घंटानादासनंतर पेढे, सुंठवड्याचे वाटप

आकर्षक मेखला, फुलाच्या माळांनी तयार केलेला हार, सजविलेल्या माउलींच्या समाधीवर लक्ष वेधून घेत होता. माउलींचे हे मनमोहक रूप भाविकांनी नयनात साठविले. जर्बेरा आणि सुगंधी मोगऱ्याच्या फुलाची सजावट सपूर्ण समाधी मंदिराला केली होती. दरम्यान, पखा मंडपात चोरट महाराजांनी ठिक बाराच्या दरम्यान कीर्तनात माउली जन्माचे वर्णन करताच भाविकांनी समाधीवर पुष्पवृष्टी करत माउली नामाचा जयघोष केला. त्यानंतर घटानाद केला आणि पेढे, सुंठवडा वाटण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply