Akola Zilha Parishad : १३ काेटी ४९ लाखांची कामे रखडले; जिल्हा परिषद सदस्यांचे डीपीओ कक्षात ठिय्या

Akola Zilha Parishad : जनसुविधेअंतर्गत विविध कामाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी नियाेजन विभागानं पालकमंत्र्यांनाही पाठवला आहे. मात्र १३ काेटी ४९ लाखांच्या कामांचे नियाेजन आठ महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे  जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा नियाेजन अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदाेलन केले. 

अकोला जिल्हा परिषदने २३ जून २०२३ च्या सभेत १३ काेटी ४९ लाखाच्या कामांचा ठराव मंजूर केला. यात माेठ्या ग्रामपंचायतअंतर्गत २६ लाखांची दाेन कामे, छाेट्या  ग्रामपंचायतीअंतर्गत ८ काेटी ४५ लाखांची ९८ कामे आणि तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत ४ काेटी ७८ लाखांच्या ५७ कामांचा समावेश आहे.  मात्र यंदाच्या कामांना आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम दाेन महिने राहिले असतानाही व लाेकसभा निवडणूक पुढील महिन्यात जाहीर हाेण्याची शक्यता असल्यानंतरही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर म्हणाले.

Dhule News : १०० हुन अधिक फटाके फोडणारे सायलेन्सर दाबले बुलडोजरखाली; धुळे पोलिसांची कारवाई

जनसुविधांअंतर्गत स्मशानभूमी, दफनभूमी, त्यासाठी भूसंपादन, विद्युतीकरण, जमीन सपाटीकरण, स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता करणे, ग्रामपंचायत भवन, आवार भिंत, गावातीलअंतर्गत रस्ते, भूमीगत गटार बांधणे, घनकचरा व्यवस्था करणे आदी कामे करता येतात. दरम्यान कामांना मंजुरी मिळत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद गट नेते गाेपाल दातकर, सदस्य गजानन भटकर, गणेश बोबडे, गायत्री कांबे, वर्षा वजीरे, विशाल गावंडे, संदीप सरदार यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, अकोला पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, अभय खुमकर, गजानन बोराळे आदी सहभागी झाले. त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी जी. के. शास्त्री यांना निधींबाबत विचारणा केली. पालकमंत्र्यांकडे यादी पाठवण्याची माहिती शास्त्री यांनी दिली. मात्र आंदोलकांचे समाधान झाले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply