Akola Shocking News : शिक्षकाचा प्रताप! शिक्षकानं पाटी देण्याऐवजी हातात दिली बाजाराची पिशवी, अकोल्यातील संतापजनक घटना

Akola Shocking News : शालेय शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत उज्वल वाट दाखवतात. उत्तम भविष्यासाठी मार्गदर्शन करतात. पण अकोल्यातील जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकाचा वेगळाच प्रकार समोर आलाय. एका शिक्षकानं आपल्या काही विद्यार्थ्यांच्या हाती पाटी नसून, चक्क भाजीपाला खरेदीसाठी पिशवी दिली आहे. जिल्हा परिषदेतील शाळेसमोर आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात एका शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जात भाजीपाला खेरदीच्या कामाला लावलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केलाय.

अकोल्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील एका व्हिडिओमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्यातल्या राजनापूर खिनखिनी गावातल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाच्या प्रतापामुळे परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केलाय. यात एका शिक्षकाने भाजीपाला खरेदीसाठी चक्क विद्यार्थ्यांना बाजाराची पिशवी पकडण्यासाठी सोबत नेलंय

Maharashtra weather : महाराष्ट्रात गारठा वाढला, ५ दिवस तापमानात चढ-उतार, ढगाळ हवामान राहणार

या गावात दर मंगळवारी राजनापुर खिनखिनी गावात आठवडी बाजार भरतो. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अगदी समोर हा बाजार भरतो. या बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू आणि भाजीपाला मिळतात. याच बाजारातील भाजीपाला खरेदी करण्यासाठी शिक्षकानं चक्क ४ ते ५ विद्यार्थ्यांना सोबत नेलं आहे. इतकंच नाही तर, त्यांच्या हातात भाजीपाला खरेदी करण्यासाठी पिशवी देखील दिली आहे. शिक्षक आधी भाजीपाला खरेदी करतो आणि नंतर मुलांच्या पिशवीत टाकतो.

दर मंगळवारी हा आठवडी बाजार भरतो. दरम्यान, दर मंगळवारी जिल्हा परिषदेतील हा शिक्षक विद्यार्थ्यांना बाजारात पिशव्या पकडण्यासाठी घेऊन जात असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे. शिक्षक शालेय वेळेत घरगुती कामासाठी विद्यार्थ्यांचा वापर करीत असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर काही नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply