Akola News : बड्या डॉक्टरांविरुद्ध होती तक्रार; पोलिसांनी महिलेला रात्री २ वाजेपर्यत ठाण्यातचं ठेवले बसवून, कारवाईच्या दिल्या धमक्या

Akola News :  एका बड्या डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला अकोला पोलिसांनी रात्री २ वाजेपर्यत ताटकळत  पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. इतकेच नाही तर चार दिवस हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले. उलट त्याच महिलेवर कारवाई करण्याच्या धमक्या पोलिसांकडून दिल्या गेल्या. तसेच गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रार महिलेनं केला आहे.

हनुमान जयंतीच्या अनुषंगानं सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या दिवशी हा प्रकार घडला. अकोला शहरातल्या जठारपेठ भागातील चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीकचे डॉ. प्रविण अग्रवाल यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला तिच्या ३ वर्षाच्या मुलासह सायंकाळपासून रात्री २ वाजेपर्यत ताटकळत ठाण्यात बसवून ठेवत गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. 

Sambhajinagar Crime : जमिनीसाठी दुसऱ्यांदा मजूर महिलांवर हल्ला; जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडून नऊ वाहने जाळली

नेमकं महिलेची तक्रार काय?
३० एप्रिलला रात्री ८ वाजता तक्रारदार महिला ही चेहऱ्यावरील आजार दाखवण्यासाठी जठारपेठ मधल्या चाइल्ड अँड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक डॉ. प्रविण अग्रवाल यांच्याकड़ं गेली होती. या दरम्यान अग्रवाल यांनी तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत महिलेचा विनयभंग केला. यानंतर दवाखान्यात मोठा गोंधळ उडाला. महिलेचा लहान भाऊ आणि डॉक्टरमध्ये शाब्दिक वादही झाला. अखेर महिलेनं ठाणं गाठलं. मात्र तक्रारीवर तब्बल चार दिवस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप तक्रारदार महीलेने केला आहे. अखेर या महिलेच्या मूळ तक्रारीवर ४ दिवसांनंतर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की सदर महिलेच्या तक्रारीनंतर दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिस अधिक्षकांकडे महिला पोलिस अधिकाऱ्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकर गुन्हा दाखल होणार. पण विशेष म्हणजे एका महिलेला रात्री २ वाजेपर्यत ताटकळत पोलिस ठाण्यात बसवून ठेवल्या जातंय हे योग्य आहे का? असा सवाल पत्रकारांनी जाधव यांना विचारला असता, ते म्हटले महिलेला रात्री ७ वाजेनंतर अटक करता येत नाही. परंतु तक्रारदार महिला कितीही वेळ ठाण्यात थांबू शकतात. असे जाधव यांचे म्हणणे हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply