Akola News : मोठी बातमी! अकोल्यात शालेय पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola News : हिंगोलीत काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातून भगरीतून १५० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. हिंगोलीतील एका आठड्यापूर्वी शेकडो लोकांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना अकोल्यातही शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील एका शालेय पोषणात आहारातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या शाळेतील 10 जणांवर उपचार सुरू आहे. पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. अकोला शहरातल्या मनपाच्या 26 नंबर शाळेतला हा प्रकार आहे.

Fake Currency : सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट; संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आज मंगळवारी दुपारी अकोला महापालिकेच्या शाळा क्रमांक 26 शिवसेना वसाहत इथं विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय अन्नातून ही विषबाधा झाल्याच प्राथमिक समोर आली आहे. दहा विद्यार्थीवर उपचार सुरू आहेत. 9 ते 10 वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आहेत. 

अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनात सर्वांवर उपचार सुरू आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले ,वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई हे उपचारासाठी मदतकार्य करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply