Akola News : घरात शिरला, भावाला कोंडलं, चाकूचा धाक दाखवत मुलीला पळवलं; शोधकार्यासाठी पोलिसांनी मागितले पैसे

Akola News : अकोल्यात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. एका २८ वर्षीय तरूणानं राहत्या घरातूनच मुलीचं अपहरण केलंय. पोलिसांकडे कुटुंबाने तक्रार केली असता, मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाकडून ५ हजार रूपये घेतली असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. तसंच गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

अकोल्यात एक धक्कादायक प्रकरण घडलं. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. हे अपहरण एका २८ वर्षीय तरूणानं केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं घरात शिरकाव केला. नंतर तिच्या १४ वर्षीय लहान भावावर चाकूनं हल्ला केला. चाकूनं हल्ला केल्यानंतर तिच्या भावाला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं.

भावाला कोंडून ठेवल्यानंतर त्याच्या अल्पवयीन बहिणीचं अपहरण केलं. मुलीचं अपहरण झाल्याचं समजताच कुटुंबाने पातूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गु्न्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी कुटुंबाकडे ५ हजार रूपयांची मागणी केली आहे.

Ajit Pawar : काही काही कार्यकर्ते चुकतात, पण आमची भावकीच चुकली, अजित पवारांनी निवडणुकीतला किस्साच सांगितला

मुली सापडावी म्हणून कुटुंबाने ५ हजार रूपये पोलिसांना दिले. मात्र, अद्यापही मुलीचा शोध लागलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक आरोप केले आहेत.

' अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याऐवजी, पोलीसच पैसे मागत आहेत. जर असं असेल तर सामान्य व्यक्तींनी दाद नेमकी कुणाकडे मागायची? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply