Akola News : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एपीआय मनोज लांडगे निलंबित; काय आहे प्रकरण?

Akola News : अकोला पोलीस दलात एपीआय मनोज लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान रजा घेऊन अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहिल्याप्रकरणी मनोज दशरथ लांडगे यांच्यावर गैरवर्तवणूकीचा ठपका ठेवला आहे. या कारणांमूळे त्यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

एपीआय मनोज दशरथ लांडगे सी.एम.एस सेल अकोल्यात नेमणूकीस होते. ते ४ दिवस किरकोळ रजेवर असतांना १० जानेवारी रोजी कर्तव्यावर हजर होणे अपेक्षित होते. मात्र प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे कारण देत डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला असल्याचे कारण त्यांनी मोबाइल द्वारे कळविले. मात्र या नंतर कुठल्याही वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे सादर न करता व वरिष्ठांना कुठलीही पूर्व सूचना न देता परस्पर रजेवरून रुग्ण निवेदन केले होते.

Maharashtra Politics : कन्फर्म! लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरल

१९ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील  हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई अशी संभाव्य पायी यात्रा होती, यामूळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलने असल्यानं कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने २० ते २८ जानेवारीला सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच एपीआय मनोज लांडगे अति महत्वाचे (रामप्रतिष्ठान अयोध्या) बंदोबस्तासाठी गैरहजर असल्याचे दिसून आलेत.

त्यांच्या या गैरवर्तणुकीबद्दल निलंबित करण्याबाबत आवश्यक असल्याची खात्री झाल्याने लांडगेविरुध्द चौकशी सुरु अकोला पोलिस आधीक्षक बच्चन सिंग यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आदेश निर्गमित शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

दरम्यान, या पूर्वी सुद्धा एपीआय मनोज लांडगे एक वर्षापेक्षा अधिक काळ परस्पर सिकमध्ये गेले होते. या बाबत बार्शीटाकळी येथील गजानन कोगदे यांनी थेट पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. असे असतानाही या कालावधीत त्यांचे वेतन सुरू असल्याचे बोलले जाते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply