Akola News : दूषित पाणी प्यायल्याने 49 ग्रामस्थ आजारी, तिघांची प्रकृती गंभीर;बेलखेडमध्ये आराेग्य विभाग डेरेदाखल

Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेड़ गावात दूषित पाणी प्यायल्यामुळे तब्बल 49 ग्रामस्थ आजारी पडले आहेत. या सर्व ग्रामस्थांवर तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे 14 विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकाच्या अंतर्गत उपचार सुरू आहेत. उर्वरित तीन जणांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना अकोला शासकीय रुग्णालय आणि अन्य तिघांना तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
 
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामपंचायत द्वारे सुरु असलेल्या बोअर वेलवरून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. ग्रामपंचायत प्रशासनानं तसंच आरोग्य विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे, असाही आरोप आता गावकरी करु लागले आहेत.

14 पथके गावात दाखल

आरोग्याच्या दृष्टीने बेलखेड येथे ६ सुपरवायझर, १ विस्तार अधिकारी, रुग्णांचे उपचार उपचाराकरिता १० समुदाय आरोग्य अधिकारी, ६ एमबीबीएस डॉक्टर, २ तालुका अधिकारी, १ जिल्हास्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले.

गावकऱ्यांनी दुषित बोअर वेलचे पाणी पिऊ नये. उघड्यावर शाैचास जाऊ नये व कोणतेही लक्षण आढळ्यास जवळील आरोग्य अधिकाऱ्यांस दाखवून उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाळवे यांनी केले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply