Akola Crime News : अकाेला पाेलिसांचा गावठी दारु अड्ड्यावर छापा, दाेघांना अटक

Akola Crime News : आलेगाव येथे सुरू असलेल्या हातभट्टी प्रकाराच्या दारु अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकला. हा छापा अकोला पोलिसांनी टाकला. या छाप्यात पाेलिसांनी गावठी दारूचा अड्डाच उद्ध्वस्त करुन टाकला. पाेलिसांनी विनोद रतन जामकर आणि उकर्डा गोविंदा शिंदे यांना ताब्यात घेतले. 

अकोल्यातील पातुर तालुक्यातलं आलेगाव इथं मोठ्या प्रमाणात काढल्या जाणाऱ्या गावठी दारु हातभट्टी अड्डयांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान २ लोकांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून दारु तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Hingoli Crime News : हिंगोलीत अल्पवयीन मुलीची छेड; दोन गटांत तुफान राडा, घरांवर दगडफेक

ही कारवाई शनिवारी मध्यरात्री पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली. पाेलिसांनी गावठी दारुचा अड्डा पूर्णपणे उध्वस्त केला. पाेलिसांनी हातभट्टीचालकांना ताब्यात घेतले आहे. यासह दारू बनविन्याचे साहित्य नष्ट केले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply