Akola Corporation : सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सव्वा कोटीचा अपहार; अकोला मनपाच्या सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल

Akola Corporation : अकोला महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोळ झाल्याचे समोर आले आहे. त्यावेळी महापालिकेत कार्यरत लिपिक हे सेवानिवृत्त झाले असून सफाई कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कमेत त्यांनीच अपहार केल्याचे समोर आल्याने सिटी कोतवाली पोलिसांत पेन्शन शाखेचे सेवानिवृत्त लिपिक अशोक गणेशराव सोळंके यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
महापालिकेमध्ये कार्यरत असलेले सेवानिवृत्त लिपिक अशोक सोळंके यांनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान सेवेत नसलेल्या लोकांच्या  खात्यात महापालिकेचे पैसे परस्पर कापून घेतले. यानंतर सदरची रक्कम काढून घेतली होती. साधारण १ कोटी २७ लाख २६ हजार ९२७ रुपये इतकी हि रक्कम होती. हि रक्कम काढून आर्थीक अपहार केला होता. याबाबतची तक्रार महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात दिली आहे. यावरून २५ जूनला अशोक सोळंके विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
वाल्मिकी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सारवान यांनी या प्रकरणाबाबत महापालिकेमध्ये अनेकदा माहिती मागितली. मात्र आधीच्या महापालिका प्रशासनाने माहिती दडपून ठेवली. अखेर विद्यमान अकोला मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले. तेव्हा प्रकरणाला वाचा फुटली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply