Akola : अकोल्यात थरार... चुलत भावांचं जोरदार वाजलं, कुऱ्हाड अन् दगड, काठीणने मारहाण, एकाचा मृत्यू

Akola Crime News : अकोल्यात कौटुंबिक वादामधून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या शिरसो गावात पारधी बेड्यावर जुन्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. चुलत भावाचे कुटुंब आपसात भिडले. कुऱ्हाड, काठीने एकमेकांना मारहाण करण्यात आल्याचं समोर आलेय. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक घटनेत एकाचा मृत्यू झालाय. तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

अकोल्यात कौटुंबिक वादात तरूणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या डोक्यात कुराडीचा वार लागल्याने गंभीर जखमी झाला अन् जागेवरच प्राण सोडले. मृत तरूणाचे वडील-आई आणि भाऊ या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.

Bird Flu : कळंबमध्येही कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्ल्यूचा संशय; अहवालाची प्रतीक्षा

मृत तरूणाचे नाव सुरज भोसले असल्याचे समजतेय. त्याचे आई-वडील गंभीर जखमी आहेत. अगदी दोन कुटुंबात कुऱ्हाड आणि लाठी काठीने मारहाण झाली. या वादाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा संपूर्ण वाद इतका विकोपाला गेला की थेट हत्येपर्यंत पोहोचला. या संपूर्ण प्रकरणात मुर्तीजापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

या संपूर्ण घटनेत तब्बल आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आरोपींमध्येही काहीजण जखमी आहेत. एकाच कुटुंबातील चुलत भावांमध्ये हा संपूर्ण वाद होता. हा वाद फक्त इतका विकोपाला गेलाय की थेट दोन्ही कुटुंब एकमेकांसमोर भिडले. एकमेकांवर कुऱ्हाडी, दगड आणि काठीने हल्ला करण्यात आला. अगदी हा मोठा वाद होता या वादाचे संपूर्ण व्हिडिओ समोर आलेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात चार लोकांना ताब्यात घेतल आहे. तसेच यापुढे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता म्हणून गावात आणि शासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सद्य गावात शांतता आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply