Ajit Pawar On Raj Thackeray: 'काही उद्योग शिल्लक नाही म्हणून हिंदी भाषेचा विरोध', अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

Ajit Pawar On Raj Thackeray : 'हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली ही मातृभाषा आहे. तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत.' अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

नाशिकमध्ये दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून झालेल्या हिंसाचार प्रकरणावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नाशिक दंगली प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कुणालाही सोडले जाणार नाही.' असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

Bajar Samiti : दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती; राज्यात नव्या ६५ बाजार समित्यांना मंजुरी

बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांच्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, 'बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी जे आरोप केले त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्या नंतर योग्य ती कारवाई केली जाईल.'

तसंच, बीडमध्ये महिला वकिलाला १० जणांनी अमानुष मारहाण केली या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 'बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. जे दोषी असतील त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.' अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply