Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले; विधानसभा अध्यक्षांनीच काढलं स्टिकर, व्यासपीठावर नेमकं काय झालं?

Mumbai  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. अजित पवारांचे समर्थकही दादा लवकरच मु्ख्यमंत्री होतीत, असं अनेकदा बोलले आहेत. आज अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

मनोरा आमदार निवास भूमीपूजन कार्यक्रम आज पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं नाव असलेल्या खुर्चीवर अजित पवार बसले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आरक्षित असलेल्या खुर्चीवरील स्टिकर काढलं. त्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले. 

Pune : निसर्गात कविता शोधणारा कवी काळाच्या पडद्याआड, ना. धों. महानोर यांचं निधन

राहुल नार्वेकर काय म्हणाले?

या घटनेनंतर सुरु झालेल्या चर्चांवर बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, आजच्या मंगलमय दिनी निरर्थक चर्चेला सुरुवात करु नका. मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांना काही वैयक्तिक काम आल्याने ते येऊ शकले नाहीत. कोणाचीही नाराजी नाही. एवढा चांगला कार्यक्रम होत असताना निरर्थक चर्चा नको. 

भरत गोगावले म्हणाले...

अजित पवार हे अनावधानाने त्या खुर्चीत बसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कणकण जाणवत होती. त्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply