
Pune : ‘विमान एका बाजूला कलल्याचे दिसल्यानंतर ते पडणार म्हणून पोरांनी गलका केला. तोपर्यंत ते कोसळले. आम्ही जिवाच्या आकांताने मोटारसायकलवरून तेथे धाव घेतली. तोपर्यंत विमानातून कोणी तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. तितक्यात खूप मोठा स्फोट झाला आणि आमच्या नजरेसमोर होत्याचे नव्हते झाले. या स्फोटाने अजितदादांना आमच्यापासून हिरावून घेतले हा धक्काच इतका मोठा होता की त्यातून अजून सावरता येत नाही...’ गोजूबावी या बारामती विमानतळाच्या गावाचे सरपंच कल्याण आटोळे सांगत होते. सांगतानाही त्यांना अश्रू आवरत नव्हते.
अजित पवार यांच्या अपघाताची पहिली खबर पोलिसांना देणारे आटोळे यांनी “महाराष्ट्र टाइम्स’ला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, 'गोजूबावीच्या विमानतळावर विमानं येणं-जाणं आमच्यासाठी नवीन नाही. आज 'दादा' (अजित पवार) विमानाने येणार आहेत, हे आम्हाला माहिती होतं. मात्र, अचानक विमानाचा वेगळाच आवाज आला. त्यामुळे चमकून पाहिलं असता, विमान डाव्या बाजूला कलून जमिनीवर कोसळले. त्यातून धूर निघत होता. 'पडले.. पडले...' असे ओरडत आम्ही गावकऱ्यांनी जिवाच्या आकांतानं मोटारसायकलीवरून विमानाच्या दिशेने धाव घेतली.'
|
Ajit Pawar Death : टेकऑफपूर्वी विमानातील अजित पवारांचा शेवटचा फोटो समोर; महाराष्ट्र हादरला |
'सकाळी आठ वाजून ४४ मिनिटाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मी आयडीबीआय बँकेपाशी डेअरीतच थांबलो होतो. गोजूबावीच्या विमानतळावर विमानांचे प्रशिक्षण चालते. बडे मंत्री, उद्योगपतींचे हवाई दौरे असतात. त्यामुळे विमानाचा आवाज आम्हाला काही नवा नाही. मात्र, या विमानाचा आवाज वेगळाच येत होता. विमान डावीकडे कलून पार खाली आले होते. ते अर्धा मिनिट पुढे गेले नसते, तर गावातच कोसळले असते. धावपट्टीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळले. मी घाबरून ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. पण, त्यावर 'एक क्रमांक दाबा, दोन क्रमांक दाबा' अशा तांत्रिक सूचना येत होत्या. त्यामुळे मी अजित पवारांचे निकटवर्तीय व विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर व परिचयाच्या पोलिस अधिकाऱ्याला फोन केला.’
‘विमानाजवळ पोहोचत असतानाच त्यातून कोणी तरी बाहेर पडत असल्यासारखे दिसू लागले. इतक्यात मोठा स्फोट झाला म्हणून आम्ही बिचकून मागे सरकलो. स्फोट होण्यापूर्वी दादा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावेत. ते दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकला... आमचे पाय थरथर कापत होते. विमान डाव्या बाजूला कलून पडलं होतं. विमानाचा दरवाजा उघडा होता. कदाचित प्रवाशांनी बाहेर उडी मारून जीव वाचवावा, यासाठीचा तो प्रयत्न होता. अचानक एखाद्या बॉम्बसारखा मोठा स्फोट झाला! तो भीषण आवाज आणि आगीचे लोळ पाहून आम्हीही घाबरून मागे पळालो. त्यानंतर थोडी हिंमत एकवटून जवळ गेलो, तेव्हा चित्र विदारक होतं. किरण गुजर तिथे पोहोचले होते, त्यांना रडू कोसळलं होतं. आम्ही ग्रामस्थांनी मिळून विमानातील चार जणांना बाहेर काढलं. त्यात तीन पुरुष आणि एक महिला होती. त्यांच्या अंगरक्षकाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. धावत जाऊन घरातून चादरी आणल्या आणि त्या देहावर पांघरल्या. त्यामध्ये एक अजित पवार होते यावर विश्वासच बसत नव्हता. पण किरण गुजरांनी दादांना ओळखले होते,’ असे आटोळे यांनी सांगितले.
‘पोलिस अधिकारी अपघाताच्या ठिकाणी आले. गावकरीही पोहोचले होते. पण पुढे काय करायचे हेच कोणाला कळत नव्हते. अपघाताच्या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे वाहने खालपर्यंत येत नव्हती. मी गावचा सरपंच असल्यानं तातडीनं गाड्यांसाठी रस्ता मोकळा करून दिला. नगरपालिकेचा पाण्याचा बंब आला खरा; पण काही वेळातच त्याचंही पाणी संपलं. पोलिसही हतबुद्ध झाले होते. इतकी मोठी घटना घडूनही यंत्रणा हतबल दिसत होती. पण दुःखद गोष्ट ही की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृतदेह अर्धा-पाऊण तास तिथेच होता. अखेर अॅम्बुलन्स पोहोचल्या व आम्ही ते मृतदेह हलविले. आमच्या लाडक्या अजित पवारांना अशा स्थितीत बघण्याची वेळ येईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण काळाने ती वेळ आज आणली. त्यावर अजूनही विश्वास बसत नाही,’ अशा शब्दांत आटोळे यांनी भावना व्यक्त केल्या.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel


1 thought on “Ajit Pawar Death : विमान एका बाजूला झुकताच प्रवाशांमध्ये घबराट; मुलांचा आक्रोश, बाहेर पडण्याचा प्रयत्न… पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं”