Ajit Pawar : ‘काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की प्रत्येकाला जायचंच असतं, पण…’ अपघाताआधीचा ४ दिवसांपूर्वीचा दादांचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Pune : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. मुंबईहून अजित पवार हे बारामतीकडे निघाले होते. मात्र विमान लँडिगदरम्यान दुर्घटना घडली आणि दादांसह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला. अजित पवार म्हटलं की निडर, दिलदार, दमदार आमि कामाचा माणूस म्हणून त्यांनी राज्यभर आपली छाप पाडली होती. दादांच्या अकाली एक्झिटने सर्वांना मोठा धक्का बसलाय, कोणालाच विश्वास बसत नाहीये की दादा आपल्यात नाही. अजित पवार यांची भाषणे, पत्रकार परिषदांमधील व्हिडीओ पाहिल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये. राजकारणातला हा दादा माणूस आता दिसणार नाही. दादांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दादा काळाच्या बोलवण्याबाबत बोलले होते. दादा त्यावेळी नेमकं म्हणाले होते? जाणून घ्या.

कोण काम यमचं राहणार आहे? तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबकता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, असं अजित दादा आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाले होते. भाजप नेते महेश लांडगे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय.

Ajit Pawar Death : अजित पवारांचा मृत्यू कसा झाला? विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; खरे कारण उघड होणार

अजित दादांचा विमान अपघात २८ जानेवारीला झाला. तर त्याआधी म्हणजेच चार दिवसांआधीचं हे भाषण आहे. जे आहे तोंडावर बोलून मोकळं होणारा दादा नेहमी सर्वांनाच आपलासा वाटला. ज्यावेळी अपघाताची बातमी आली त्यावेळी कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण नियतीपुढे कोणी मोठं नाही, राजकारणातील दादा एका विमान अपघातामध्ये आपण गमावला.

महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादांचा फोटो दिसला. विरोधी, सत्ताधारी, जात-धर्म असा कसलाही भेदभाव दिसला नाही, इतक्या खोलवर दादांनी सर्वांच्या मनात आपली जागा बनवली होती. शब्दाचा पक्का असलेला दादा आपल्यात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामधील कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. महापालिका निवडणुका झाल्यावर आता दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला लागले होते. दादांचा अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या ४ सभा होणार होत्या. मात्र काळाने दादांना बारामतीत उतरण्याआधीच हिरावलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Ajit Pawar : ‘काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की प्रत्येकाला जायचंच असतं, पण…’ अपघाताआधीचा ४ दिवसांपूर्वीचा दादांचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *