Ajit Pawar : 'शपथ खरी करुन दाखवली...' मराठा आरक्षणाच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar : मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरकारी अध्यादेश हातात पडल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

"राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहेत. दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली, त्याचा सार्थ अभिमान आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Amravati News : हृदयद्रावक घटना! अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्याने उपोषणाच्या मंडपात संपवले आयुष्य

महायुती सरकारकडून धडाडीचे निर्णय...

तसेच "मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात खूप कष्ट घेतले. आरक्षणावर त्यांनी मार्ग काढला तो सर्वांना मान्य झाला. महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत आहेत आगामी काळात देखील असेच निर्णय घेत राहील," असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply