Air India : एअर इंडियाच्या विमानासह सात विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विमानाचे आपत्कालीन लँन्डिंग!

Air India Emergency Landing in Canada : गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या अशा प्रकारच्या धमक्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता मंगळवारी देखली सात वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर या विमानाचे आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले, तर दुसरीकडे दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या विमानाचे कॅनडामध्ये आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी एअर इंडियाच्या विमानासह सात वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, “१५ ऑक्टोबर २०२४ रोजी एअर इंडियाच्या दिल्ली ते शिकागो (AI 127) या विमानाला धमकी आली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान कॅनडातील इक्लुइट विमानतळावर उतरवले. त्यानंतर विमान आणि प्रवाशांची सुरक्षा प्रोटोकॉलनुसार तपासणी करण्यात आली. तसेच एअर इंडियाने प्रवाशांना त्यांचा प्रवास पुन्हा सुरू होईपर्यंत मदत करण्यासाठी विमानतळावर एजन्सी सक्रिय केल्या”, असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं.

Pune : मोबाइलवरील मालिका बंद केल्याने मुलाकडून आईवर हल्ला- घरातील खिडकीच्या काचा फोडल्या; धनकवडीतील घटना

दरम्यान, विमानांना अशा प्रकराच्या धमक्या आल्यानंतर चौकशी करण्यात आली असता या सर्व धमक्या एकाच व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिल्याची माहिती समोर आली. मात्र, या धमक्या खोट्या असल्याचंही सांगितलं जातं आहे. दरम्यान, यामुळे शेकडो प्रवाशांना अडचणींना समारे जावे लागले. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

कोणत्या सात विमानांना धमक्या आल्या?

जयपूर ते बेंगळुरूमार्गे अयोध्या (IX765) एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट, दरभंगा ते मुंबई (SG११६) स्पाईसजेट फ्लाइट, बागडोगरा ते बेंगळुरू (QP१३७३) आकाशा एअर फ्लाइट, दिल्ली ते शिकागो (AI १२७) एअर इंडियाचे फ्लाइट, दम्मम (सौदी अरेबिया) ते लखनौ (6E ९८) इंडिगो फ्लाइट, अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट (९I ६५०) आणि एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX ६८४) मदुराई ते सिंगापूर.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply