Ahilyanagar : अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर' होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Ahilyanagar : नगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अहिल्यादेवी यांचे वडिलांकडे आडनाव शिंदे होते आणि मी पण शिंदे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वांची मागणी आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. त्यामुळे अहमदनगरच लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार, राज्य सरकराने निर्णय घेतला आहे. नाव बदलण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचे भाग्य आहे, असे शिंदे म्हणाले.

अहिल्यादेवी यांचं कार्य हिमालया ऐवढं मोठ आहे. त्यामुळे अहमदनगच नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या सोहळ्याचे साक्षिदर मी आणि देवेंद्र फडणवीस झालो, याचा मला अभिमान आहे. नामांतर केल्यामुळे नगरचा मान देखील वाढणार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणार हे सरकार आहे.

मला गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. ज्यांनी इथं येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच सरकार वीस दिवसात घालवण्याचे काम आम्ही केले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना लगावला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply