Ahmednagar Politics : ...तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही; सुजय विखेंचं निलेश लंकेंना ओपन चॅलेन्ज

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अहमदनगर येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके  यांना ओपन चॅलेन्ज दिलं आहे.

मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते.

या मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंके यांनी हे आव्हान दिलं आहे. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असं सुजय विखेंनी म्हटले आहे. त्यामुळे आता सुजय विखेंचं हे चॅलेन्ज निलेश लंके स्वीकारतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *