Ahmednagar : मनोज जरांगेंची शांतता रॅली 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये धडकणार; सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Ahmednagar : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी त्यांची शांतता रॅली अहमदनगर शहरात येणार आहे. या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता शहरासह उपनगरातील सर्व शाळा तसेच महाविद्यालये बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आजच्या दिवसाची तासिका इतर दिवशी भरून काढवीत, असंही आदेशात म्हटलं आहे. राज्य सरकारने तातडीने सगेसोयरेंची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तसेच त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे.

Brazil Plane Crash : उड्डाण भरताच विमान गरागरा फिरलं अन् कोसळलं; 62 प्रवाशांच्या मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात केली आहे. या शांतता रॅलीला लाखो मराठा बांधवांची गर्दी जमत आहे. या गर्दीला संबोधित करत मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रामुख्याने त्यांच्या रडारवर मंत्री छगन भुजबळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत

दुसरीकडे आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरा करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीच राजकीय मंडळी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे येत्या 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यात येणार असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply