Ahmednagar Muslim Family Conversion : धर्मांतर का केलं? आधी 'शेख' असलेल्या 'शिवराम'ने स्पष्ट सांगितलं

Ahmednagar Muslim Family Conversion : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वरबाबा) यांच्या राम-हनुमान कथा आणि दिव्य दरबाराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी समारोपाच्या दिवशी या कथा सोहळ्यात ९ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. जमील शेख यांनी कुटुंबासह हिंदू धर्म स्विकारला. शेख यांनी ही घरवापसी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान धर्मांतर का केलं? यावर आधी 'जमील शेख' असलेले 'शिवराम आर्य' यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. शिवराम आर्य म्हणाले, "आमचे आजी-आजोबा जालन्याला राहत होते. पूर्वजापासून आम्ही हिंदू धर्माला मानतो. आपला सनातन धर्म आहे हे आधीपासून आम्हाला सांगितलं गेलं. कुणाच्याही दबावात यायचं नाही. नेहमी हिंदू देवतांची पूजा करावी. हे आम्हाला सांगितलं. आम्ही आमची घरवापसी केली मला खूप अभिमान वाटला."

Nitesh Rane : 24 डिसेंबर रोजी संजय राऊत तुरुंगात जाणार?; नितेश राणे यांचा सर्वात मोठा दावा काय?

"नातेवाईक मुस्लीम आहेत. मात्र मी त्यांच्यापासून मी खूप दुरू आहे. मी दुःखात एकटा होतो. मी हिंदू देवतांची पूजा करतो. आम्ही गणपती देखील बसतो. जे नश्वर आहेत त्यांच्या मागे आम्ही पळत नाही. देव अनंत आहेत. धर्मातील इतर लोकांचा मला त्रास झाला नाही. मला लोकांच काही घेणदेण नाही. मला माझ्या प्रभूकडं जायचं आहे. माझे मुलं मी गुरुकुलमध्ये टाकणार आहे. त्यांनी धर्माचा प्रचार केला पाहीजे", असे शिवराम यांनी सांगितलं.

काल मला विचारण्यात आलं की नाव काय ठेवावं. मी म्हटलं माझं नाव शिवराम ठेवा. जे देवाचे नाव घेत नाहीत त्यांच्या मुखातून नेहमी शिवराम नाव निघायला हवं. त्यामुळे मी हे नाव ठेवलं. लहान्या मुलाचं नाव क्रिष्ण तर मोठ्या मुलाचं नाव बलराम ठेवलं. धार्मिक नाव  घरात मी ठेवलं. यामुळे वाईट प्रवृत्ती घरापासून दूर राहते. आमचं आर्य आडनाव आहे. त्यामुळे मला अभिमान आहे. काल आम्ही धर्मांतर केलं. पूजा करण्यात आली. शुद्धीकरण करुन घेतलं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply