Ahmednagar Fraud Case : ॲक्टिंगचा नाद! गेले तेवीस लाख,चित्रपटात काम देण्याचे आमिष; कॅमेरामनला बेड्या

 Ahmednagar Fraud Case : अहमदनगरमधून फसवणुकीची घटना समोर आली आहे. मुलीला चित्रपटात अभिनयाची संधी देण्याच्या आमिषाने वडील शिक्षकांकडून तब्बल २३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नगरमध्ये समोर आला आहे. कोतवाली पोलिसांनी हा बनाव उघड करून दोन आरेापींना बेड्या ठोकल्या आहेत. राजेश भगवान पवार व अमित अरविंद देशमुख (दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

राजेश पवार हा कॅमेरामॅन म्हणून छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काम करायचा. त्याची २०१६ मध्ये शिरीषकुमार कदम (वय ५० रा. निर्मलनगर, सावेडी) यांच्याशी ओळख झाली. कदम हे एका विद्यालयात शिक्षक आहेत.

Zika Virus : बंगळुरूमध्ये आढळला झिका व्हायरस! आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर; जाणून घ्या लक्षणे

 

तुमच्या मुलीला चित्रपटात काम देतो, असे आमिष पवार यांनी कदम यांना दाखविले. सुरुवातीला तीन लाखांची मागणी केली. मुलीला सिनेसृष्टीत जाण्याची इच्छा असल्याने कदम यांनी याला पैसे पाठविले. त्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगसाठी ओतूर (जि. पुणे) येथे बोलावून घेतले. काही दिवस शुटिंग केल्यानंतर पवार याने कदम यांच्याकडे कागदपत्रांच्या नावाखाली पैशांची मागणी केली.

कदम यांनी तब्बल तेवीस लाख रुपये पवारच्या खात्यावर जमा केले. मात्र, कोणत्याही चित्रपटात त्यांची मुलगी झळकली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कदम यांनी पैसे परत मागितले. कदम यांनी हा प्रकार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कानावर घातल्याने आरोपींना अटक झाली.

कदम यांना २३ लाख रुपयांच्या मोबदल्यात आलिशान कार देतो, असे पवारने सांगितले. कदम यांना नगरच्या आरटीओ कार्यालयासमोर बोलावून घेतले. मात्र शंका आल्याने त्यांनी हा प्रकार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना फोनवरुन सांगितला. निरीक्षक यादव यांनी आपल्या पथकासह सापळा लावला. कार देण्याच्या नावाखाली बोगस कागदपत्रांवर सह्या घेताना तोतया आरटीओ अधिकारी देशमुख व पवार यांना बेड्या ठोकल्या.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, " नोकरीचे आमिष असो की, चित्रपटात काम करण्याचे पालकांनी बळी पडू नये. कोणीही पैसे घेऊन नोकरी किंवा चित्रपटात काम देतो, असे सांगितल्यास संबंधिताची तक्रार पोलिसांना द्या."



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply